आव्हाळवाडी, ११ ऑक्टोबर २०२०: राज्य शासनाच्या सुधारित आराखड्यानुसार जिल्हा परिषद पातळीवर आणि एक विकास कामाचा समावेश करण्यात आला आहे. नैसर्गिक मृत्यू तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावआतून मृत्यूची वाढती संख्या लक्षात घेता अंत्यसंस्कार करिता ग्रामीण भागातील नागरिकांची होणारी गैरसोय पाहता ग्रामीण पातळीवरील स्मशानभूमी सुधार योजना राबविण्यात भर दिला जात आहे.
योजनेअंतर्गत आव्हाळवाडी येथे शवदहन स्टॅन्ड बसविण्यात आले आहे. यामुळे एकाच वेळी दोन मृतदेहावर अंत्यविधी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. सदर काम मार्गी लागलेली ग्रामपंचायत प्रशासनाने आभार व्यक्त केले आहे.
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या निधीचा तुलनेत कमी झाला आहे. अशाही स्थितीत कार्यकुशल सदस्य म्हणून प्रशासनात वजन असल्याने जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांच्या माध्यमातून वाघोली आव्हाळवाडी गटात विकासकामांसाठी निधी खेचून आणला जात आहे. त्यामुळे अनेक विकासकामे आत्तापर्यंत मार्गी लागली आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे