पॅरीस १२ ऑक्टोबर,२०२० :स्टार टेनिसपटू राफेल नदाल याने तेराव्या वेळी फ्रेंच ओपन एकेरीचे विजेतेपद मिळवले आहे. याच विजया सोबत ३४ वर्षीय राफेल नदाल याने आपल्या कारकिर्दीतले विसावे स्लॅम विजेतेपद आपल्या नावी केले आहे. तसेच आपला प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर याची त्याने (३९)बरोबरी केली आहे.
राफेल नदाल याने विश्व क्रमांक एक टेनिसपटू सर्बियाचा स्टार नोवाक जोकोविच याला सरळ सेट मध्ये ६-० ,६-२, ७-५ असा विजय मिळवला. १८ वे विजेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरलेला जोकोविच आपलं १८ वे विजेतेपद मिळविण्याचे स्वप्नं पूर्ण करू शकला नाही.यांच्या दोघांतील सामना हा २ तास ४१ मिनिट रंगला.
दोन्ही खेळाडूंमध्ये फ्रेंच ओपन मध्ये ८ व्या वेळी आमना सामना झाला. यात ७ व्या वेळी नदाल ने विजय मिळवला. आतापर्यंत ग्रँड स्लॅम मध्ये दोघे ही १६ व्या वेळी आमने सामने आले होते ज्यात राफेल नदाल याने १० व्या वेळी विजय मिळवला.
तसेच सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच याच्या नावे आतापर्यंत १७ ग्रँड स्लॅम विजेतेपद आहेत. त्याने ३ यू एस ओपन, ८ ऑस्ट्रेलियन ओपन, ५ विम्बल्डन आणि १ फ्रेंच ओपन विजेतेपद आपल्या नावी केले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे