मुंबई, १२ ऑक्टोंबर २०२०: मुंबई महानगर क्षेत्रात ग्रीड फेल झाले आहे. मुंबई टाउनशिपमधील वीजपुरवठा करणारी कंपनी बेस्ट म्हणाली की वीजपुरवठा केंद्रामुळं ग्रीड निकामी झाली आहे. मुंबईच्या पूर्व, पश्चिम, उपनगरे आणि ठाण्याच्या काही भागांत वीज गायब झाली आहे. ह्यामुळं लोकांना अडचणींना सामना करावा लागत आहे. इतकच काय तर या ग्रीड निकामी झाल्यामुळं मुंबईतील लोकल देखील थांबल्या आहेत.
ग्रीड बिघाडाच्या जवळपास तासाभरा नंतर नवी मुंबईसह पश्चिम उपनगरातील काही भागात विजेचा प्रवाह पूर्ववत झाला आहे. इतर भागातील वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
ग्रीड मध्ये केव्हा बिघाड झाला
१०.१५ वाजता संपूर्ण मुंबईत वीज पुरवठा खंडित झाला. कलवा येथे टाटा पॉवरच्या सेंट्रल ग्रीडच्या बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईतील वीज पुनर्संचयित होण्यास एक तास लागू शकतो असं सांगण्यात आलं आहे. ग्रीड बिघाडामुळं मुंबई शहर व उपनगरामध्ये वीज गायब झाली आहे. यामुळं मध्य, पूर्व आणि पश्चिम मार्गावर रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या आहे.
३६० मेगावॅटचा पुरवठा बाधित
मुंबई प्रणालीला वीजपुरवठा करण्यासाठी लाईन व ट्रान्सफॉर्मर्स (कलवा-पडगे आणि खारगर आयसीटी) वर अनेक ट्रिपिंग आहेत. मुंबईतील ३६० मेगावॅट पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. संपूर्ण मुंबईत वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याचं काम सुरू आहे.
मुंबईची लाईफ लाईन थांबली
ग्रिड बिघाडाचा मुंबईकरांवरही परिणाम झाला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मुंबईची लाईफलाईन मानले जाणाऱ्या लोकल देखील जागी थांबले आहेत त्यामुळे प्रवाशांना गैरसोय होत आहे. रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) म्हणाले की, ग्रीड बिघाडामुळे मुंबई लोकल ट्रेनची सेवा विस्कळीत झाली आहे. एकदा वीजपुरवठा सुरू झाला की लोकल सेवा पुन्हा सुरू होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे