दुबई , १३ऑक्टोबर,२०२० आयपीएल २०२० मध्ये झालेल्या २८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने सामने होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने ८२ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासोबतच बँगलोर संघ टॉप ४ मध्ये पोहोचला आहे.
सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीच्या फलंदाजांनी संघाला चांगलीच सुरुवात करून दिली. आरोन फिंच याने ३७ चेंडूत ४७ धावा केल्या. तसेच फॉर्म मध्ये असलेला फलंदाज देवदत पदिकल याने ३२ धावा ठोकल्या. त्यानंतर सामना सांभाळला तो कर्णधार विराट कोहली आणि ए.बी.डीविल्यर्स यानी, दोघांनी ही उत्कृष्ट फलंदाजी करत २० षटका अखेर आर.सी.बी. संघाला २ बाद १९४ धावांपर्यंत पोहचवले. यात विराट कोहली याने नाबाद २८ चेंडूत ३३ तर दुसरीकडे ए.बी.डीविल्यर्स याने नाबाद ३३ चेंडूत ७३ धावा केल्या. यात ६ षटकार आणि ५ चौकरांचा समावेश होता. कोलकाता संघाकडून गोलंदाजी करतांना पी. कृष्णा आणि आंद्रे रसल याला १/१ विकेट्स मिळाल्या.
१९५ धावांचा डोंगर चढण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाला गरज होती ती चांगल्या सुरुवातीची, पण असे होऊ शकले नाही. टॉम बँटन हा अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. तसेच गिल याने ३४ धावा केल्या.तसेच रसल याने १६ तर त्रिपाठी ने ही फक्त १६ धावांचे योगदान दिले. बँगलोर संघाकडून गोलंदाजी करतांना क्रिस मॉरिस आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी २ विकेट्स तर नवदीप सैनी, सिराज, युजवेन्द्र चहल आणि उदाना यांना प्रत्येकी १/१ विकेट्स मिळाल्या.अप्रतिम गोलंदाजी मुळे कोलकाता नाईट रायडर्स फक्त ९ बाद ११२ धावा करू शकले आणि बँगलोर संघाने सामना ८२ धावांनी जिंकला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे