पुणे, १३ ऑक्टोबर २०२०: खान्देश मराठा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ५१ जणांनी रक्तदान केले. ८४ जणांनी प्लाझ्मा दानासाठी नोंदणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सध्या संपूर्ण जग हे कोरोनाशी लढत असताना आपल्या सर्वच रक्तपेढ्या मध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे व कोरोना महामारीमुळे रक्तदान करण्यास रक्तदाते बाहेर पडण्यास कमी झाले आहेत.
कार्यक्रमास खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अदिती जोशी, नगरसेविका शर्मिला बाबर, अनुराधा गोरखे तसेच डॉ. महेश पाटील, सतिश आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान व प्लाज्मा दान कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खान्देश मराठा मंडळाचे सर्व पदधिकारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे.












































