पुणे, १४ ऑक्टोबर २०२०: दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वजन कमी झाली असल्याचे शरद पवार यांनीच बोलण्यास सुरू केले होते. असा आरोप पवारांचे विरोधक बाळासाहेब विखे पाटील यांनी केला आहे. ‘चव्हाण यांचे राजकारणातील वजन घटले, की नाही, हे माहिती नाही; मात्र त्यांच्या स्वयंघोषित मानसपुत्राने स्वत:चे वजन वाढविण्याचा प्रयत्न केला,’ अशा शब्दांत नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘देह वेचावा कारणी,’ या आत्मचरित्रात पवार यांच्यावर टीका केली आहे.
विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले आहे. विखे यांनी आत्मचरित्रात राजकारण, समाजकारण, शेती आणि सहकार अशा वेगवेगळ्या क्षेत्रावर लिहिले आहे. १९७७ च्या काळात मोठी राजकीय घडामोडी झाल्या यामध्ये यशवंतराव चव्हाण बाजूला पडले. त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या शब्दाला किंमत होती, मात्र त्यांचे राजकीय वजन घटल्याची चर्चा पवार यांनी सुरू केली होती असे विखे यांनी लिहिले आहे.
पवार यांनी पुरोगामी लोकशाही दलाचा (पुलोद) प्रयोग करून मुख्यमंत्री पद मिळविले. मात्र त्यानंतर महाराष्ट्रीत राजकारणाने वळण घेतले व्यक्तिगत राजकीय बळ, महत्त्वाकांक्षेला महत्त्व आले. असे विखे पाटील यांनी पुस्तकात नमूद केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव