कऱ्हा, नीरा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा

17

पुरंदर दि.,१४ ऑक्टोबर,२०२०:पुरंदर तालुक्यातलं सर्वच भागात आता पाऊस सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील ओढे नाले पाण्याने भरून वाहत आहेत.पाऊस वाढतच असल्याने नदी व ओढ्या काठच्या लोकांनी सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना जेजुरी पोलिसांच्यावतीने देण्यात आला आहे.

गेली तीन चार दिवस पुरंदर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.सर्वत्र पाऊस असल्याने कऱ्ह्या व नीरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नीरा नदीतून २४ हजार कयुसेक वेगाने पाणी नीरा नदीत सोडण्यात येत आहे.तर नाझरे धरणातून २५०० क्युसेक वेगाने पाणी कऱ्हा नदी पत्रात सोडण्यात येत आहे.तर तेवढेच पाणी धरणामध्ये येत आहे.कऱ्हा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पाऊस सुरू असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे कऱ्हा नदी काठच्या वाळुंज, निळुंज, बेलसर, कोथळे, रानमळा, नाझरे क.प, नाझरे सुपे, पांडेश्वर, जवळार्जुन गावातील ग्रामस्थांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात यावे अशा सूचना पोलिसांनी त्या गावातील पोलीस पाटील यांना दिल्या आहेत. नदीकाठच्या गावातील पोलीस पाटलांनी एक मेकाच्या संपर्कात राहून परिस्थितीची माहिती द्यावी.तसेच पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती तातडीने द्यावी अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

सतर्कतेचा इशारा देण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रथमच वापर
गेल्या आठवड्या पासून जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमधून ग्रमासुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आज या यंत्राने मार्फत पोलीस नाईक संदीप कारंडे यांनी कऱ्हा नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा ईशरा दिला आहे.आज पहिल्यांदाच या यंत्राने मार्फत पोलिसांनी जेजुरी पोलीस स्टेशन मधील सर्व गावातील लोकांना एकाच वेळी सतर्कतेचा संदेश देण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी :- राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा