पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राहुल शिंदे तर उपाध्यक्षपदी किशोर कुदळे यांची बिनविरोध निवड

पुरंदर, १८ ऑक्टोबर २०२०: पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न पुरंदर तालुका पत्रकार संघाची आज द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये न्यूज अनकटचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांची अध्यक्षपदी तर किशोर कुदळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी पुरंदर तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणीचीही निवड करण्यात आली.

पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या १८ ऑक्टोबर २०२० ते १७ ऑक्टोबर २०२२ या दोन वर्षाच्या मुदतीसाठी घेण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या नऊ जागांसाठीच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रत्येकी एक असे नऊच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल भांडवलकर यांनी जाहीर केले. यासाठी सतीश सांगळे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले.

नवीन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य पुढील प्रमाणे:
अध्यक्ष राहुल दिनकर शिंदे, उपाध्यक्ष किशोर तुकाराम कुदळे, सरचिटणीस अमोल अरविंद बनकर, कोषाध्यक्ष निलेश प्रकाश भुजबळ, जिल्हा प्रतिनिधीपदी राजेंद्र ज्ञानोंबा शिंदे, तालुका समन्वयक प्रवीण सोपान नवले, सह सरचिटणीसपदी स्वप्नील अशोक गायकवाड, तर कार्यकारिणी सदस्यपदी योगेश साहेबराव कामथे, विशाल हनुमंत फडतरे, निखिल सतीश जगताप, चंद्रकांत विष्णु चौंडकर यांची बिनविरोध निवड झाली.

नवीन कार्यकारिणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, दत्तानाना भोंगळे, बी. एम. काळे, बाळासाहेब ननवरे, प्रकाश फाळके, हेमंत ताकवले, प्रदिप जगताप, बाळासाहेब कुलकर्णी, नितीन राऊत, प्रकाश खाडे, संतोष जंगम, मामासाहेब गायकवाड, दत्ता जाधव, विजय पवार, जिवन कड, सुजाता गुरव यांनी अभिनंदन
केले.

न्यूज अनकट प्रतीनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा