खडसे समर्थकांची बॅनरबाजी, राष्ट्रवादीतील प्रवेशाचा मुहूर्त ठरला

मुंबई, २१ ऑक्टोबर २०२०: आतापर्यंत एकनाथ खडसे हे भाजप पक्ष सोडलेला नाही असं म्हणत होते. पण, आता त्यांनी स्वत: राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचं पंतप्रधान मोदींवर टीका करणारं ट्विट रिट्विट करुन राष्ट्रवादीत जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याआधी ते भाजपचा राजीनामा देऊन सर्व पदं सोडणार आहेत.

महत्त्वाचं म्हणजे समर्थकांकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर मात्र भाजप पक्षाचे कोणतेही चिन्ह नाही. मुक्ताईनगरमधील खडसेंच्या फार्म हाऊसवर कार्यकर्त्यांची गर्दी वाढली आहे. खडसेंच्या प्रवेशाबाबत त्यांचे विश्वसनीय समर्थकांचं म्हणणं आहे की, लवकरच एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा घटस्थापनेचा मुहूर्त चुकल्यानंतर आता त्यांनी राजकीय सीमोल्लंघनासाठी नवी वेळ निश्चित केली आहे. त्यानुसार एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.

काय होते ट्विट

एकनाथ खडसे यांनी बुधवारी राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी केलेले एक ट्विट रिट्विट केले. या ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला, असे जयंत पाटलांनी म्हटले होते. एकनाथ खडसे यांनी हे ट्विट रिट्विट करून पहिल्यांदाच भाजपविरोधी भूमिका घेतली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा