माढा, २१ ऑक्टोबर २०२०: राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी वर्ग उध्वस्त झाला आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट एकरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी अन्यथा माढा तालुका रासपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने प्रांत कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले. आंदोलनकर्त्याचे निवेदन कार्यालयीन प्रतिनिधी पी.एस. शिंदे यांनी स्वीकारली. या आंदोलनास शंभू सेना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जाहिर पाठिंबा दिला.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप गडदे, स्वाभिमानी जिल्हा कार्याध्यक्ष आजिनाथ परबत, विधानसभा अध्यक्ष धनाजी कोकरे, सत्यवान गायकवाड, शहराध्यक्ष अभिजीत सोलंकर, वैभवी भिसे, कैलाश खिलारे, नितीन चव्हाण, सद्दाम पटेल, किरण अस्वरे, रुपेश खांडेकर, नागेश लवटे, गोरख वाकडे, प्रियंका वाघमोडे, भागवत तांबे, शिवाजी सोनवणे, शिवाजी वाघमोडे, बाळासाहेब नगरे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील