‘कोथरूड ऑनलाईन नोकरी महोत्सवा’ चे उद्घाटन !

5

पुणे, २२ ऑक्टोबर २०२०: भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने काल ‘कोथरूड ऑनलाईन नोकरी महोत्सवा’चे उद्घाटन पार पडले. कोरोना संकटाच्या काळात लाॅकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई, बेरोजगारीचा सामना सर्वांना करावा लागत आहे. यावेळी अनेकांना या परिस्थितीतीला तोंड देणं अशक्य होतंय.

याच पार्श्वभूमीवर कोथरूड विधानसभा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने कष्ट करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम करण्याची संधी देण्यात येत आहे. ‘कोथरूड ऑनलाईन नोकरी महोत्सव’ अंतर्गत जास्तीत जास्त युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून आज ‘ऑनलाईन कोथरूड नोकरी महोत्सव’च्या वेबसाईटचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण केले.

या महोत्सवाचे आयोजन कोथरुड युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी केले आहे. याप्रसंगी कोथरुड मंडळ अध्यक्ष पुनीतजी जोशी, युवा मोर्चा सरचिटणीस निलेशजी सोनवने तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे