किल्ल्यांनी जपला… ऐतिहासिक वारसा – चावंड

“जुन्नर तालुका हा पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील भाग. जुन्नर तालुक्यातील एक महत्वाचा किल्ला म्हणून चावंड किल्ल्याची ओळख. तालुक्यातून कुकडी नावाची नदी आहे. या नदीच्या उगम स्थानाजवळ हा किल्ला आहे. या किल्ल्याला पूर्वी कुकडनेर असेही नाव होते. या किल्ल्याला चावदंगड उर्फ प्रसन्नगड असेही नाव आहे. इतिहासात या किल्ल्याचा उल्लेख जुंड म्हणूनही आलेला आढळतो.”

सन१४८५मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहंदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यात चांवड किल्ल्याचे नाव आढळते. बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले होते. इ.स.१५९०-९४ दुसरा बुऱ्हाण निजमशाह हा निजमशाहितला सातवा निजाम. याचा नातू बहादुरशहा १५९४ साली चांवड किल्ल्यावर कैदेत होता.

१६३६मध्ये शहाजी राजांनी आदिलशहा आणि मोगलंपासून बचाव करण्यासठी जो तह केला. त्यात चावंड हा किल्ला मोगलांना मिळाल्याची माहिती मिळते. या गडाची अनेक नावे आहेत. चामुंड, चाउंड, चावंड ही नावे चामुंडा शब्दाचा अपभ्रंश आहे.चुंड हे नाव निजामशाही आमदानीतील नाव आहे. प्रसन्नगड हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेले नाव. मलिक अहमदने शिवनेरी किल्ला जिंकल्यानंतर आपल्या एका सरदाराच्या हाती हा किल्ला दिला होता. या किल्ल्यात भरपूर लूट त्याच्या हाती आली होती.

जोड किल्ल्यांची व्यवस्था आपल्या एका सरदाराच्या हाती सोपवून त्याने लोहगडकडे आपला मोर्चा वळवला. माहितीनुसार अहमदनगरची निजामशाही मलिक अहमदच्या अधिकारपुढे झुकलेली नव्हती. त्याचा पाडाव करण्यासाठी त्याने कूच केले. त्यावेळी त्याने अनेक किल्ले त्याने बळाचा वापर करून घेतले. त्यात चावंड, लोहगड, तिकोना, कोंढाणा, पुरंदर,जीवधन होय. इतिहासात मिळालेल्या माहितीनुसार गुलशन इब्राहीमी आदिलशहाच्या सैन्यांशी लढताना इब्राहिम निजामशहाच्या डोक्यात गोळी लागू तो ठार झाला होता. निजामशाही वकील मिया मंजू याने अहमद नावाच्या मुलाला दौलताबादच्या कैदेतून सोडवून गादीवर बसवले.त्याचवेळी त्याने इब्राहिमच्या अल्पवयीन मुलाची म्हणजे बहादूरशहची चावंडला बंदीवासासाठी रवानगी केली. चांदबीबी ही बहादूरशहाची आत्या. मिया मंजुने बहादूर शहावर असलेले चांदबीबीचे पालकत्व हिरावून घेतले.

चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्याच्यावर पाण्याची सातटाकी एकाच ठिकाणी असल्याने तो सप्त मातृकांशी संबंधीत आहे.चांवड निजामशाहीत जाण्याअगोदर तेथील किल्लेदार महादेव कोळी जमातीतील असावा असे तेथे असणाऱ्या वस्तीवरून दिसून येते.तेथील अवशेषांना पाहता आणि राजमार्ग अभ्यासता चांवड किल्ला हा सातवाहनकालीन असल्याचे दिसून येते. निजामशाही वारसदाराला ठेवण्यासाठी चांवड किल्ल्याचा वापर केला गेला.यावरून त्याची दुर्गमता दिसून येते. त्याचा इतिहास बखरींमध्ये नसला तरी मौलिक लोकसाहित्यात आढळतो.

हा किल्ला सध्या पर्यटकांच्या केंद्रस्थानी असल्याचे पहायला मिळते. तरुणाई ट्रेकिंगच्या माध्यमातून अनेक किल्ल्यांना भेटी देत असतात. त्यामुळे चामुंडा किल्ल्याचा उपयोग फक्त निजमशाहीसाठीच झाल्याचे पहायला मिळते.

-प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा