पिंपरी चिंचवड, २६ ऑक्टोबर २०२०: पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी अंतर्गत प्रभाग क्रमांक – ९ विठ्ठल नगर याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकारणी शाखेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष इंजिनियर देवेंद्र तायडे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व नवीन कार्यकारणीस नियुक्तीपत्र देऊन पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष देवेंद्रजी तायडे म्हणाले की , सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या मूल्यांची तत्वे जोपासून समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत हक्क आणि अधिकार देण्यासाठी वंचित बहुजन बहुजन आघाडी कटिबद्ध असल्याचे जाहीर केले.
यावेळी पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष सुहास देशमुख प्रवक्ते के. डी. वाघमारे राजन नायर पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारणी सदस्य युवा नेते कमलेश दादा वाळके, महासचिव रहीम सय्यद, सम्यक विद्यार्थी आंदोलन पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संतोष जोगदंड, विजय गेडाम, भारतीय बौद्ध महासभा शाखाध्यक्ष बापूसाहेब माने, ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण जोगदंड, सूर्यकांत जावळे, रघुनाथ साळवे, पांडुरंग डोंगरे, विठ्ठल नगर शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी शाखा विठ्ठलनगर प्रभाग क्रमांक 9 खालील प्रमाणे घोषित करण्यात आली:
अमोल माने – अध्यक्ष
शेखर सरवदे – उपाध्यक्ष
शेख – उपाध्यक्ष
संदीप हाके – महासचिव
अरुण उबाळे – सचिव
अजित वाघोले – संघटक
विलास शिखरे -संघटक
परशुराम पवार – खजिनदार
ईश्वर वावरे – सहखजिनदार
आकाश कांबळे – प्रसिद्धीप्रमुख
मुबारक शेख – हिशेब तपासणीस मार्गदर्शक – मा. बापूसाहेब माने, मा. नवनाथ चौधरी, मा. राहुल इनकर.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे