दुसऱ्या तिमाहीत एअरटेलचे ७६३ कोटींचे नुकसान

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२०: दिग्गज टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने दुसर्‍या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या दुसर्‍या तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ तोटा ७६३ कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच काळात कंपनीला २३,४०५ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. तर पहिल्या तिमाहीत कंपनीचे १५,९३० कोटी रुपयांचे नुकसान झाले.

दुसऱ्या तिमाहीत कंपनीची कमाई सुधारली. सप्टेंबर -२०२० या तिमाहीत कंपनीच्या महसुलात २२ टक्क्यांनी वाढ होऊन २५,७८५ कोटी रुपयांवर पोहचले आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीचे उत्पन्न २१,१३१ कोटी रुपये होते. तर या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न २३,९५० कोटी रुपये होते.

दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ४९.३ कोटी रुपयांचा एकरकमी तोटा झाला. दुसर्‍या तिमाहीत एअरटेलचे एकत्रित एबिटडा ११,८४८ कोटी रुपये होता. दुसर्‍या तिमाहीत भारती एअरटेल एबिट्डा मार्जिन ४६ टक्के होता. दुसऱ्या तिमाहीच्या आधारे कंपनीची अन्य उत्पन्न ४८०.५ कोटी रुपयांवरून घसरून १४८.९ कोटी रुपयांवर आली आहे.

दुसर्‍या तिमाहीत एअरटेलचा सरासरी महसूल (एआरपीयू) १६२ रुपये झाला आहे, जो एक वर्षापूर्वी १२८ रुपये होता. गेल्या काही दिवसांपासून एअरटेलच्या शेअर्सवर दबाव होता. मंगळवारी एअरटेलचा शेअर बीएसई वर ०.२४ टक्क्यांनी घसरून ४३३ रुपयांवर आला. सध्या कंपनीची मार्केट कॅप २.३६ लाख कोटी रुपये आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा