पुरंदर २८ ऑक्टोबर २०२०:पुरंदर तालुक्यातील परिंचे येथे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजने अंतर्गत बेघरांचे घरकुलाचे स्वप्न साकार झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांच्या उपस्थितीत गृहप्रवेश समारंभ पारपडला.
सन२०१९-२०२० वर्षात मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी मंजूर घरकुलाचे बांधकाम त्वरित केले.नुकतेच या घरकुलाचे हस्तांतरण लाभार्थ्यास करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, माजी सरपंच समीर जाधव, सोपान राऊत, ग्रामसेवक शशांक सावंत आदी उपस्थित होते.
या योजने अंतर्गत लाभार्थ्याला शासनाकडून प्रति लाभार्थी एक लाख वीस हजार रुपयांचे अनुदान घरकुल बांधण्यासाठी दिले जाते. सदरील लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत स्वतः काम केले असेल तर त्याला अठरा हजार रुपये मजुरी रक्कम दिली जात असल्याचे जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांनी यावेळी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे.