महिलांच्या सुरक्षेसाठी आंध्रप्रदेशमधील ‘दिशा’ कायद्याप्रमाणे राज्यातही होणार नवीन कायदा

जळगाव, २ नोव्हेंबर २०२०: महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आंध्र प्रदेशात ‘दिशा’ कायदा करण्यात आला आहे. याच कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लवकरच नवा कायद्या लागू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. येत्या अधिवेशनात या कायद्याबाबत कार्यवाही केली जाईल, असं आश्वासनही देशमुख यांनी यावेळी दिले.

अमळनेर येथे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे उद्घाटन तसेच एरंडोल पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख अमळनेर येथे आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळाली आहे. हे प्रशिक्षण केंद्र लवकरच पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. परंतु, प्रशिक्षण केंद्र दुसरीकडे हलवले, अशी चुकीची माहिती विरोधकांनी पसरवली, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. तसेच वरणगाव येथील प्रशिक्षण केंद्र लवकरच पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासनही देशमुख यांनी दिले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा