आजपासून लखनौचं विमानतळ खाजगी होणार, अदानी ग्रुप पाहणार सर्व कामकाज

लखनौ, २ नोव्हेंबर २०२०: लखनौचं अमौसी विमानतळ म्हणजेच चौधरी चरणसिंग विमानतळ आजपासून खासगी हाती देण्यात येणार आहे. २ नोव्हेंबरपासून अदानी ग्रुपचे अधिकारी विमानतळ चालविण्याची जबाबदारी स्विकारतील. विमानतळाच्या व्यवस्थापनापासून आर्थिक बाबीपर्यंत केवळ अदानी समूहाचे अधिकारी निर्णय घेतील.

अदानी ग्रुप पुढील ५० वर्षांसाठी लखनऊच्या चौधरी चरणसिंग विमानतळाचा पदभार स्विकारेल. करारानुसार अदानी ग्रुपचे अधिकारी विमानतळ प्रशासनाबरोबर पहिले तीन वर्षे काम करतील. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ) चे जवान पूर्वीप्रमाणंच सुरक्षा यंत्रणेला आज्ञा देतील.

अग्निशमन यंत्रणा आणि अभियांत्रिकी सेवा देखील अदानू ग्रुपचे अधिकारी हाताळतील. असं म्हटलं जातं की या विमानतळावरील कोणत्याही सुविधेच्या फीमध्ये अद्याप वाढ केलेली नाही. विमानतळावर सुविधांचा विस्तार करण्याची योजना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या धर्तीवर लखनऊ विमानतळावरही मोफत पिक आणि ड्रॉप सेवा दिली जाऊ शकते.

विमानतळावर नवीन टर्मिनल टी-३ च्या उभारणीसह रनवेचा विस्तारही करण्यात येणार आहे. लखनऊ विमानतळाचं व्यवस्थापन अदानी समूहाकडं देण्यासंबंधी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा