पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२० : राज्यातल्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघांची निवडणूक येत्या एक डिसेंबर रोजी होणार आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर विभागाच्या पदवीधर मतदार संघाची तर अमरावती आणि पुणे विभागाच्या शिक्षक मतदार संघांची निवडणूक या अंतर्गत होणार आहे.

निवडणूक आयोगानं आज या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत १२ नोव्हेंबरपर्यंत असून १३ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागं घेता येणार आहेत. मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार असल्याचंही निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा