भाजपचे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या विरोधात आंदोलन

बारामती, ५ नोव्हेंबर २०२०: काल दि. ४ बुधवारी भारतीय जनता पार्टी बारामती शहर व तालुक्याच्या वतीने रिपब्लिकन भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुडबुद्धीने झालेल्या अटकेच्या निषेधार्थ प्रशासकीय भवनावर आंदोलन करून तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार व माध्यम यांचा गळा घोटण्याचे काम सध्याचे महाबिघाडी सरकार करत आहे.१९७७ साली भारतात माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली होती. आणि यामाध्यमातून त्यांनी पत्रकार,लेखक, विचारवंत यांना अटक केली होती. त्याच पद्धतीने सध्याचे महाबिघाडी सरकार पत्रकारांवर दडपशाही करत आहे.असे निवेदन तहसीलदार विजय पाटील यांना दिले.

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके, भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, भाजपचे पुणे जिल्हाउपाध्यक्ष प्रशांत सातव, भाजपचे पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्य गोविंद देवकाते,भटक्या विमुक्त युवक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस अभिकाका देवकाते, कायदा आघाडीची पुणे जिल्हा सहसंयोजक नितीन भामे, सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्रचे सहसंयोजक अक्षय गायकवाड, भाजयुमोचे शहराध्यक्ष सचिन मलगुंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा