नवी दिल्ली, ६ नोव्हेंबर २०२०: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना बळ देताना केंद्र सरकारनं या कंपन्यांची नोंदणी आणि सुविधा पुरवण्याबाबतच्या नियमांमध्ये सवलती देऊन बहुतेक मागण्या पूर्ण केल्या आहेत. यामुळे या कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरून काम देण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
दूरसंचार विभागानं इतर सेवा पुरवठादारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असून माहितीशी संबंधित बीपीओ उद्योगाला इतर सेवा पुरवठादार कंपन्यांसाठी असलेल्या नियमांमधून वगळलं आहे. भारताला तंत्रज्ञान केंद्र बनवण्यासाठी आणि देशात व्यवसाय सुलभता आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून सांगितलं आहे.
माहिती तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानसेवा, बीपीओ क्षेत्राला या सवलतींमुळे चालना मिळेल, तसच घरातून काम करण्यासाठी देशात एक चांगले वातावरण निर्माण होईल, असं इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी