दुपारी १२.३० ला रिट्रीट हॉटेलवर शिवसेना आमदारांची महत्त्वाची बैठक

77

मुंबई: आज दुपारी १२.३० च्या दरम्यान आदित्य ठाकरे शिवसेना आमदारांची महत्त्वाची बैठक घेणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरेही उपस्थित असण्याची शक्यता आहे. आज मध्यरात्री ही आदित्य ठाकरे यांनी रिट्रीट हॉटेल वर शिवसेना आमदारांची बैठक घेतली होती त्यानंतर आज दुपारी पुन्हा बैठक होणार आहे.
राज्यपालांकडून भाजपला सत्तास्थापनेचे आमंत्रण आल्यानंतर भाजपमध्ये आमदारांची जुळवाजुळव चालू आहे. या सर्वांमध्ये शिवसेनेचा कोणता आमदार फुटू नये याची काळजी म्हणून आमदारांवर लक्ष ठेवण्यासाठी बहुदा ही बैठक घेण्यात येणार असेल. भाजपकडून शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदासाठी जोपर्यंत लिखित स्वरूपात प्रस्ताव येत नाही तोपर्यंत शिवसेना कोणतीही तडजोड करणार नाही यावर शिवसेना अजूनही ठाम आहे.