लालूप्रसाद यांची प्रकृती खालावली, ७५ टक्के किडनी निकामी

रांची, ८ नोव्हेंबर २०२०: एकीकडे बिहारचं राजकाण ढवळून निघालं असतानाच दुसरीकडे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त आहे. लालू प्रसाद यादव यांच्यावर रांची येथील रिम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती काही दिवसांपासून स्थिर होती. मात्र, काल (७ नोव्हेंबर) अचानक प्रकृती पुन्हा खालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डायबिटीजमुळं क्रिएटिनिन लेव्हल वाढली आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

शनिवारी लालू प्रसाद यादव यांच्या जामीनावर सुनावणी झाली. मात्र, न्यायालयानं त्यांचा जामीन मंजूर केला नाही. त्यानंतर लालू प्रसाद यादव मानसिक तणावात गेले आहेत. तसेच मधुमेहाचा आजार असल्याने लालूंच्या क्रियेटनीन पातळीत अचानक वाढ झाली आहे.

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अशीच खालावत गेली तर काही दिवसांनी डायलिसीस करावी लागेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. लालू यांच्या प्रकृतीबाबतचा रिपोर्ट हायकोर्टाने मागितली होता. त्यानंतर रिम्स रुग्णालयाने काल लालू यांच्या प्रकृतीचा रिपोर्ट हायकोर्टाला दिला.

लालू प्रसाद यादव जेव्हा रिम्समध्ये उपचारासाठी दाखल झाले होते तेव्हा त्यांची किडनी ३ बी स्टेजला होती. सध्या ती ४बी स्टेजला पोहचली आहे. सध्या लालू यांची किडनी फक्त २५ टक्के काम करत आहे. लालू यादव यांना रुग्णालयात दाखल केल्यादिवशी त्यांची किडनी ३बी स्टेजवर होती. मात्र, आता ती स्टेज ४ वर पोहोचली आहे. गेल्या दोन वर्षात इन्सुलिन आणि डॉक्टरांच्या सल्ल्यामुळं किडनीनं चांगलं काम केलं. मात्र, आता पुन्हा त्यांची किडनी निकामी होत चालली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा