चीननं बिडेन यांना विजयी झाल्याबद्दल अभिनंदन करण्यास दिला नकार…

बीजिंग, १० नोव्हेंबर २०२०: अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी म्हणून घोषित झालेले डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बिडेन यांचं अभिनंदन करण्यास चीननं नकार दिलाय. चीननं सोमवारी सांगितलं की, अमेरिकेच्या निवडणुकीचे निकाल निश्चित होणे बाकी आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप त्यांचा पराभव स्वीकारला नाही आणि निवडणुकीच्या निकालाला न्यायालयात आव्हान देण्याचंही बोललं आहे. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक जागतिक नेत्यांनी बिडेन यांचं त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं.

रशिया आणि मेक्सिको व्यतिरिक्त चीन हा सर्वात मोठा देश आहे ज्यानं बिडेन यांचं अभिनंदन केलं नाही. ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापार युद्ध सुरू झालं होतं. उरलंसुरलं नंतर कोरोनाव्हायरस मुळं देखील संबंध खराब झाले. कोरोना विषाणूमुळं अमेरिकेत प्रचंड नुकसान झालं, इतकेच काय तर सर्वात प्रवाहित देश सुद्धा सध्या अमेरिकाच आहे. या सर्वाला ट्रम्प यांनी चीनला जबाबदार धरलं होतं. हाँगकाँगमध्ये मानवाधिकारांच्या उल्लंघनावरून अमेरिका आणि चीनमध्ये संघर्षही झाला.

नियमित पत्रकार परिषदेतील प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले, “आमचा समज आहे की अमेरिकेच्या कायद्यांनुसार आणि कार्यपद्धतीनुसार निवडणुकांचे निकाल निश्चित केले जातील.” पत्रकारांकडून वारंवार प्रश्न विचारले जात असताना वांग यांनी बिडेन यांचा विजय स्वीकारण्यास नकार दिला. ते म्हणाले, आम्हाला आशा आहे की अमेरिकेत आलेले नवीन सरकार चीन विषयी काहीतरी मधला मार्ग काढेल .

रविवारी ट्रम्प यांनी एका ट्विटमध्ये पराभव स्वीकारण्यास नकार दिला. ट्रम्प यांनी ट्विट केलं होतं की, आधीपासूनच मीडिया ठरवत आहे की अमेरिकेचे अध्यक्ष कोण असतील? ट्रम्पप्रमाणेच मेक्सिकोचे अध्यक्षही त्यांचा पराभव स्वीकारण्यास तयार नाहीत. मेक्सिकोचे अध्यक्ष मॅन्युएल लोपेज औब्रेडर यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दर्शविला आहे की कायदेशीर लढाई संपेपर्यंत ते बिडेन यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करणार नाही. लोपेझ यांनी ट्रम्प यांचं कौतुक केलं आणि सांगितलं की आपल्याबद्दलची त्यांची वृत्ती अत्यंत आदरयुक्त आहे.

निवडणूक जिंकल्याबद्दल रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनीही बिडेन यांचं अभिनंदन केलं नाही. विशेष म्हणजे रशियाच्या विरोधी पक्षानं बिडेन यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. २०१६ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत पुतीन यांच्यावर मध्यस्थी केल्याचा आणि ट्रम्प यांना विजयी करण्यात मदत केल्याचा आरोप होता. हे स्पष्ट आहे की बिडेन रशियाविरूद्ध अधिक आक्रमक आणि कठोर वृत्ती स्वीकारू शकतात. गेल्या महिन्यातच, बिडेन यांनी रशियाला अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका म्हटलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा