अमरावती, ११ नोव्हेंबर २०२० : जिल्हा परिषद,अमरावती मधील जिल्हा स्वच्छ भारत मिशन कक्षा व्दारे दिवाळीचे शुभेच्छा पत्र तयार करण्यात आले असून, या शुभेच्छा पत्रातून कोविड उपाययोजना आणि खबरदारी घेणे बाबत आवाहन करणारे तसेच शासना मार्फत ग्राम स्तरावर राबविण्यात येणाऱ्या योजनेची जनजागृती करणारे शुभेच्छापत्र तयार करण्यात आले आहे.
अमरावती जिल्हा स्वच्छ भारत मिशन कक्षा व्दारे ग्राम पातळीवर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देणारी दिवाळी शुभेच्छा पत्रं तयार करण्यात आली आहेत. कोविड – १९ बाबत लोकानी बेसावध राहू नये. मास्क वापरावे, सुरक्षित शारिरीक अंतर राखावं साबणानं हात वारंवार आणि स्वच्छ धुवावे असा संदेश हि दिवाळी शुभेच्छा पत्रं देतात.
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत अमरावतीजिल्हयातील १३ ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. या ग्रामपंचायती मध्ये या पर्यावरण जागराच्या अभियानाची व्यापक प्रसिध्दी व्हावी म्हणून माझी वसुंधरा अभियानाच्या वैशिष्टयावर आधारित दिवाळी शुभेच्छा पत्रंही तयार करण्यात आली आहेत. हि कल्पक शुभेच्छा पत्र आणि त्या वरिल संदेशाची मोठी सध्या प्रशंसा होताना दिसते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: