प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आसिफ बसरा यांनी केली आत्महत्या

हिमाचल प्रदेश, १३ नोव्हेंबर २०२०: प्रसिद्ध चित्रपट अभिनेता आसिफ बसरा यांनी गुरुवारी हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळेत आत्महत्या केली आहे. टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेते असिफ हे हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे भाड्याच्या घरात राहत होते. त्यांनी काल सकाळी ११.३० वाजता आत्महत्या केली. १२.३० वाजता पोलिसांना आत्महत्येची माहिती मिळाली.

आसिफ यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हिमाचल प्रदेशच्या कांग्राचे एसएसपी विमुक्त रंजन यांनी सांगितलं की, चित्रपट अभिनेते असिफ बसरा धर्मशाळेतील एका खासगी आवारात मृत अवस्थेत आढळले होते. त्यांनी फाशी घतली होती. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी हजर झाली तर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी एवढं मोठं पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आसिफ बसरा कोण आहेत?

आसिफ बसरा यांच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी बर्‍याच मोठ्या चित्रपटांत काम केलं आहे. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत सर्वत्र त्यांनी आपलं अभिनय कौशल्य पसरवलं आहे. सुशांतसिंग राजपूतच्या काय पो छे या चित्रपटातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याशिवाय राणी मुखर्जीच्या हिचकीमध्येही असिफ यांनी उत्तम काम केलं होते . हृतिक रोशनच्या क्रिश ३ आणि सैफ अली खानच्या कालाकांडीतही त्यांनी उत्कृष्ट काम केलं. वेब सीरिजबद्दल बोलताना आसिफ यांनी पाताल लोक आणि होस्टिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आसिफ यांनी प्रत्येक मोठ्या तऱ्याबरोबर काम केलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा