मुंबई, १३ नोव्हेंबर २०२० : सातत्याने राष्ट्रीय सरासरी पेक्षा कमी असलेला राज्यातील कोविड १९ चा बरे होण्याचा दर आता राष्ट्रीय सरासरीच्या जवळपास पोहचला आहे. काळ राज्यातला हा दर ९२.४४ शतांश टक्के होता तर राष्ट्रीय सरासरी ९२.८९ शतांश टक्के इतकी होती. दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत कोरोना बाधित सापडण्याचे प्रमाणही काल प्रथमच १८ टक्क्यापेक्षा कमी नोंदवण्यात आले. सप्टेबर महिन्यात २२ टक्यांपेक्षा अधिक असलेले हे प्रमाण ऑक्टोबर मध्ये संथ गतीने पण सातत्यानी कमी होते, काल १७.९७ शतांश टक्क्यांवर आले.
राज्यामध्ये काल ४४९६ नवीन रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे आता राज्यातील करोना बाधित एकूण संख्या १७,३६,३२९ इतकी झाली आहे. काल ७८०९ रुग्ण बरे झाले त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची सख्या आता १६०५०६४ वर पोहोचली आहे. काल १२२ मृत्यूंची नोंद झाली त्यामुळे आत्ता पर्यंत कोविड १९ मुले राज्यात मरण पावलेल्यांची संख्या ४५६८२ झाली आहे.राज्याचा मृत्यू दर २.६३ 2 शतांश टक्के इतका झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी