नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वर जी महाराज यांच्या १५१ व्या जयंती समारोहानिमित्त ‘स्टैच्यू ऑफ पीस’ चे अनावरण करतील.
१५१ इंचाची उंच मूर्ती अष्टधातू ८ धातूंनी बनविली गेली असून कॉपर हा त्याचा प्रमुख घटक असून राजस्थानमधील पाली येथील जेटपुरा येथील विजय वल्लभ साधना केंद्र येथे तो स्थापित करण्यात आला आहे.
श्री विजय वल्लभ सुरीश्वर जी महाराज जे १८७० ते १९५४ दरम्यान येथे वास्तव्य करीत होते, त्यांनी जैन संत म्हणून कठोर जीवन व्यतीत केले आणि भगवान महावीरांचा संदेश देण्यासाठी निस्वार्थ व समर्पितपणे कार्य केले.
जनतेच्या कल्याणासाठी, शिक्षणाचा प्रसार, सामाजिक दुष्कर्म निर्मूलनासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले, स्फूर्तिदायक साहित्य लिहिले आणि स्वातंत्र्य चळवळीला व स्वदेशीच्या कार्याला सक्रीय पाठबळ दिले.
त्यांच्या प्रेरणेने, महाविद्यालये, शाळा आणि अभ्यास केंद्रांसह प्रख्यात ५० हून अधिक शैक्षणिक संस्था बर्याच राज्यांत कार्यरत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी