आता कोरोना नंतर ‘या’ आजारानं काढलं डोकं वर

मुंबई, १८ नोव्हेंबर २०२०: कोरोना विषाणूनं जगभरात आत्तापर्यंत ठाण मांडून अनेक जणांचं कुटूंब उद्ध्वस्त केलं आहे. आज कोरोना विषाणू वर मात करणाऱ्या माणसांनाही पुर्वी सारखं त्यांचं आयुष्य जगता येत नाहीये. आजार बरा झाल्या नंतर देखील रूग्णांना इतर व्याधी उद्भवत आहेत असं संशोधनातून अनेक वेळा समोर आलं आहे. त्यातच आणखी एका आजारानं कोरोना झाल्यानंतरच्या रूग्णांसाठी डोकं वर काढतो की काय ही भिती निर्माण झालीय.

कोरोना मुक्त झालेल्या रूग्णांमधे सध्या ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ हा आजार होतोय. श्वसनाशी संबंधित एक दुर्मिळ असा हा आजार आहे. मुंबईतील एका ४९ वर्षीय कोरोना बाधित महिलेला हा आजार झाल्याचं निदान झालं. तसं पाहिलं तर कोरोनामुक्त रूग्णाला हा आजार होणं फार दुर्मिळात दुर्मिळ आहे. महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली म्हणून तिला डिस्चार्जड देण्यात आलाय. तर परळच्या गोल्बल रूग्णालयात महिलेवर उपचार झाले.

काय आहे ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’

गुलियन बॅरी सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे. मुळात, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आसल्यास संसर्गजन्य आजार पटकन होतात, पण हा आजार रोगप्रतिकारक शक्तीनं केलेल्या हल्लामुळं होतो. मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचे विषाणू बोटं,पाय, हात, फुफ्फुसं आणि श्वसननलिकेवरही हल्ला चढवतो. अशावेळी रूग्णांची अवस्था पक्षघात म्हणजेच लकवा मारल्या सारखा होते. तसं या आजाराला आणखी एक कारण आहे, ते म्हणजे श्वसन व गॅस्ट्रो इंटेस्टाइनल कोणत्याही व्हायरल इन्फेक्शन मुळं होऊ शकतो.

तसं कोरोना मुक्त झालेल्या रूग्णांमधे इतर आजारांचा शिरकाव नविन गोष्ट नाहीये. कोरोना विषाणू पासून बचावलेल्या रूग्णांना पुर्णपणे बरं होण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागतो. विषाणू जरी शरीरातून नष्ट झाला तरी तो शरीरातील अनेक भागांवर हल्ला करतो ज्यांना रिक्वर होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळं कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांनी नियमित व्यायाम, सकस पौष्टिक आहार, कोणत्या ही गोष्टींचा ताण न घेणं असा दिनक्रम ठरवला पाहीजे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा