दिवाळीतील गर्दीमुळे डिसेंबर-जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता – केंद्रीय आरोग्य विभागानं वर्तवली शंका

8

पुणे , १८ नोव्हेंबर २०२० : दिवाळीतील गर्दीमुळे डिसेंबर-जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता केंद्रीय आरोग्य विभागानं वर्तवली आहे. त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे शहरात तापाचे रुग्ण आढळणाऱ्या भागांत विशेष कोरोना तपासणी केली जाणार आहे.

२५ नोव्हेंबरपासून महापालिका प्रशासन ही मोहीम राबवणार आहे. या मोहिमेसाठी खासगी हॉस्पिटलची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणाही विकसित केल्याची माहिती महापालिका प्रशासनानं आज दिली. शहरात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून करोनाच्या नवीन बाधितांचा आकडा कमी झाला आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी मोठी गर्दीही झाली आहे. यामुळे करोनाचा किती प्रसार होईल, हे समजण्यास किमान दोन आठवड्यांचा कालावधी जाणार आहे.

त्यानंतरच नवीन बधितांची संख्या समोर येणार असली, तरी महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून २५ नोव्हेंबरपासून शहरात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी