पुणे, २२ नोव्हेंबर २०२०: राज्यात २३ नोव्हेंबर ला बहुतांश ठिकाणी शाळा उघडण्याची घंटा वाजणार आहे.आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकार देखील कंबर कसून तयारी करत आहेत. राज्यातील सर्वंच शिक्षकांची कोरोना चाचणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. पण, काही ठिकाणी शिक्षकच कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. ज्यामुळं पालकांमधे भितीचं वातावरण निर्माण झालं. राज्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. तर रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिका व शेजारील शाळांना वगळता ५४५ शाळा चार तास सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे.
शाळा सुरू करण्यावर तापलं राजकारण…
शाळां बाबतीत राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळं आता विरोधक ताशेरे ओढताना दिसत आहेत. राज्यातील शाळा सुरु करण्याची घाई करू नये, अशी मागणी भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. महाराष्ट्र हा एक आहे. त्यामुळं एक असणार्या राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेगवेगळे निर्णय कसे घेऊ शकतात? बीड मधील मुलं विद्यार्थ्यी नाहीत का? मुंबई-ठाण्यातील विद्यार्थ्यांचं काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
शाळेच्या निर्णयाबाबत घरच्या गोठ्यातून ही मिळतोय आहेर…..
राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती बदलली आहे. तसंच शाळा सुरू करण्याचा निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं. पुढं ते या निर्णया संबधी मंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं करणार आसल्याचं ही ते म्हणाले.
विद्यार्थांना शाळेत येण्याची सक्ती नाही…
एकीकडं सरकार ने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडं विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती नसल्याचं ही सांगितलं. राज्यातील शाळा सुरू होत आहेत तर काही भागात बंद देखील ठेवण्यात आल्या आहे. यामुळंच विद्यार्थ्यांमधे संभ्रमित अवस्था झाली आहे तर कोरोना संसर्गाची भिती देखील भेडसावत आहे. अश्यातच उच्च व तंत्रशिक्षण राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ‘शाळा सुरू झाल्या नंतर विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती नसंल ते ऑनलाईन शिक्षण ही घेऊ शकतात’अशी माहिती दिली.
शालेय शिक्षणाचा एव्हढा गदारोळ चालु आसतानाच महाराष्ट्राच्या पालकांचं लक्ष लागलं होते. अर्थात शिक्षकांच्या कोरोना चाचणीकडं ज्याचे निकाल सरकारच्या निर्णयावर प्रश्न चिन्ह निर्माण करू शकते. राज्यात झपाट्यानं शिक्षकांची कोरोना चाचणी होत आहे. तर कोरोना पाॅजिटिव्ह चा अकडा ही त्याच वेगानं वाढताना दिसतोय.
सोलापूर
सोलापुर जिल्हातील ग्रामीण भागातील आत्तापर्यंत १७८ शिक्षकांचा कोरोना अहवाल हा सकारात्मक आला आहे. तर सोलापुर शहरातील ३३० शिक्षकांचे कोरोना रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळं सोलापुरच्या शहरी शाळांना दिलासा मिळाला आहे तर आजून काही शिक्षकांचे अहवाल येणं बाकी आहे. ग्रामीण भागात जवळपास १० हाजार ७९९ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली.
सोलापुरच्या पालकांची मुलांना शाळेत पाठविण्याचा निर्णयात सकारात्मकता….
राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णयावर अनेक ठिकाणी सर्व्हे करण्यात आला. ज्यामधे सोलापुर च्या पालकांना मुलांना शाळेत पाठवायचं की नाही हा प्रश्न पडला. मात्र, सोलापुर मधील ८२% पालकांचं या प्रश्नाला हो असं उत्तर मिळालं ज्यामुळं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी “शाब्बास सोलापूरकर” म्हणून सोलापुचे अभार मानले.
नांदेड
नांदेड जिल्हात देखील शिक्षकांना कोरोनाने सोडलं नाही. नांदेड मधे २२ शिक्षकांना या विषाणु ची लागण झाली. तर आत्तापर्यंत ५ हजार २४२ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. २२ शिक्षकांचा कोरोना रिपोर्ट पाॅजिटिव्ह आल्यामुळं नांदेड मधी पालक व विद्यार्थ्यांमधे भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
वाशिम
वाशिम जिल्हातील ८ शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे तर अजून ही ९३९ शिक्षकांची कोरोना चाचणी होणं बाकी आहे. २५५१ पैकी १६१२ शिक्षकांच्या चाचण्या झाल्या आहेत.
४०० पेक्षा अधिक शिक्षकांना कोरोनाची लागण….
शाळेत शिकावयला जाणारे शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचार्यांना कोरोनाची चाचणी अनिवार्य करण्यात आले आहे. एका रिपोर्ट नुसार,४०० पेक्षा जास्त शिक्षकांना कोरोनानं विळखा घातला आहे. विदर्भात सर्वाधिक २००, मराठवाड्यात ९७, खान्देशमधे २३ तर पश्चिम महाराष्ट्रात १३२ शिक्षक कोरोना पाॅजिटिव्ह आढळले आहेत. पुढं हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई,ठाणे, पुणे शहरातील शाळा बंद राहणार आसून आता यांच्या पाठोपाठ नाशिक आणि नागपूर मधे देखील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक ची शाळा ४ जानेवारी पर्यंत तर नागपूर ची १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहणार आहेत.
सरकारच्या या शाळा उघडण्याच्या निर्णयानं पुढं काय घटना घडतील हे तर येणारी वेळच सांगेल पण आत्ताची एकंदरीत परिस्थिती पाहून शाळा भरली अन् पाटी फुटली…..अशी स्थिती नक्कीच झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव