पुणे, २३ नोव्हेंबर २०२०: नवरा बायको मधे कधी कश्या वरून वाद सुरू होईल किंवा गमतीशीर किस्से घडतील हे कोणीच सांगू शकत नाही. पण, आजचा किस्सा तुम्ही वाचल्यानंतर नक्कीच थोडसं हास्य तुमच्या चेहरावर येईल आणि थोड्या विचारात देखील पाडाल. आज असाच एक पती पत्नीची गोष्ट आम्ही सांगत आहोत.
एका गर्भवती महिलेनं नाव व पत्ता न सांगता हि गोष्ट रिडीट वर लिहिली आहे. महिलेल्या अचानक घरात खुपच घाण वास येवु लागला. तिनं पतीला विचारलं आसता त्यानं कुत्रा जेरी कडं बोट दाखवलं आणि महिलेनं कुत्र्यावर महिनाभर उपचार केले. सगळ्या टेस्ट केल्या तरी वास जात नव्हता. वास जात नसल्यानं नंतर पतीनं आपण पादत आसल्याचा खुलासा केला. तेव्हा तिनं रागाच्या भरात पतीला घरच्या बाहेर हाकलून दिलं. नंतर उपचारचे पैसे आणि पोट साफ करण्याच्या अटीवर तिनं त्याला घरात घेतलं.
या घटनेनंतर आजच्या जगात कधी कुठं काय घडंल हे खरंच कोणी सांगू शकणार नाही. मात्र, प्रत्येकानं आपल्यात थोडे बदल केले तर मग नक्की काहीतरी चांगलं घडू शकतं. जर पतीनं आधीच त्याच्या पादण्याची कबुली देत स्वतावर उपचार केला आसता तर आज चित्र वेगळे आसते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव