नवी दिल्ली, २४ नोव्हेंबर २०२०: देशातील काही राज्यात कोरोना विषाणूचं प्रमाण पुन्हा वाढत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ नोव्हेंबरला कोरोनामुळं सर्वाधिक प्रभावित झालेल्या ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतील. सकाळी १० वाजल्यापासून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. यानंतर, उर्वरित राज्यांचे मुख्यमंत्री दुपारी १२ वाजेपासून पंतप्रधानांच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत सामील होतील. मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा आणि कोरोना लस देण्याच्या रणनीतीवरही या बैठकीत चर्चा होऊ शकंल.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही या बैठकीला उपस्थित राहतील
बर्याच राज्यांत कोरोना साथीच्या वेगानं पसरल्यामुळं चिंतेत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतील. मुख्यमंत्र्यांसह राज्यातील वरिष्ठ अधिकारीही सामील होतील. इतकंच नव्हे तर कोरोना लस देण्याच्या योजनेच्या अनुषंगानं ते चर्चा करतील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होईल. सूत्रांच्या माहितीनुसार यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचादेखील समावेश असेल. यापूर्वीही पंतप्रधानांनी या विषयासंदर्भात बैठक घेतली आहे.
काही राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणं झपाट्यानं वाढली
पंतप्रधान मोदींनी कोरोनामधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आतापर्यंत अनेकदा राज्यांशी बैठक घेतल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या ५० हजारांवर आली आहे. त्याचबरोबर काही राज्यांमध्ये प्रकरणं झपाट्यानं वाढली आहेत. काही शहरांमध्ये नाईट कर्फ्यू देखील लागू करण्यात आलाय.
लसची आतुरतेनं प्रतिक्षा
वास्तविक, कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये, प्रत्येकजण आतुरतेनं लसची वाट पाहत आहे. अशा परिस्थितीत कोविड -१९ लस प्रथम कोणाला मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर नीती आयोगानं प्राथमिक रणनीती तयार केली आहे. प्राथमिक आयुक्त सदस्य डॉ. व्ही.के. पॉल म्हणाले की, प्राथमिक टप्प्यात १ कोटी आरोग्यसेवा आणि अग्रभागी कामगारांना प्राधान्य दिलं जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे