खोरोची ( ता.इंदापूर ) येथील इंदापूर तालुका शिवसेना गट उपतालुका प्रमुखपदी सुदर्शन दादासो साखरे यांची नुकतेच निवड करण्यात आली.

इंदापूर प्रतिनिधी दि.२६ नोव्हेंबर २०२० : इंदापूर येथे शिवसेना कार्यालयामध्ये पक्षाच्या प्रमुख कार्यकत्यांच्या बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. बैठकीमध्ये तालुक्यात पक्ष मजबुतीकरणासह कार्यकत्यांना येणा-या अडचणीसह अन्य विषयांवर चर्चा झाली.

यामध्ये खोरोची येथील निमसाखर – निमगाव केतकी जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना उपतालुका प्रमुख सुदर्शन दादासो साखरे यांची निवड झाली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थित साखरे यांना शिवसेना संपर्कप्रमुख सत्यवान उभे, जिल्हाप्रमुख ॲड राजेंद्र काळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, भीमराव भोसले, उपजिल्हाप्रमुख संजय काळे, तालुकाप्रमुख नितीन शिंदे, तालुका संघटक सुदर्शन रणवरे, माजी तालुकाप्रमुख योगेश कणसे, माजी तालुकाप्रमुख नितीन कदम यांसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा