फिल्मसिटी उभी करणे म्हणजे पाणीपुरीची गाडी लावण्याइतपत सोपे नाही…….

मुंबई, ३ डिसेंबर २०२०: उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या मुंबई दौर्यासाठी आले होते. ज्या मधे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्तर प्रदेश मधे जगातील सर्वश्रेष्ठ बाॅलिवूड फिल्मसिटी बनवण्याची घोषणा. ज्या मुळे राज्यातील राजकारण हे चांगलेच तापले.

बाॅलिवूड चित्रपट सृष्टीला महाराष्ट्रात १०० वर्षांचा इतिहास आसून, आता ती चित्रपट सृष्टी उत्तर प्रदेश मधे उत्तम रित्या हाताळण्याचा मानस युपीच्या मुख्यमंत्र्यांचा आहे. ज्यामधे योगी ने युपीमधे १००० एकरावर फिल्मसिटी उभारणार असे सांगितले. तर त्यावर प्रत्युत्तर देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील उद्योग कुणीही परराज्यात घेऊन जाऊ शकत नाही.

या विषयावर एकिकडे राजकारण तापलं तर दुसरीकडे महाराष्ट्रातील जनता देखील याला विरोध करताना दिसत आहे. नेटकर्यांनी तर योगी सरकारवर चांगलाच हल्लाबोल चढवला आहे. ज्या राज्यातून लोक महाराष्ट्रात पोटं भरायला येतात, तिथे फिल्मसिटी उभारणार. फिल्मसिटी तयार करा आणि राम कदम ची हिरोईन कंगना ला करा. युपींच्या लोकांसारखे मुख्यमंत्री ही कामासाठी महाराष्ट्रात दाखल अश्या प्रकारे मुख्यमंत्री योगी सरकार नेटकरी ताशेरे ओढताना दिसत आहे.

सोशल मिडियावरील काही प्रतिक्रिया……

या दौर्यावर अनेकजणं भाजपवर प्रश्न उभे करत आहेत. योगी राज्यात येऊन बाॅलिवूड सृष्टी वर अशी वक्तव्य करत असताना भाजप पक्षातील नेते आता कुठे गेले? की, महाराष्ट्र त्यांचा नाही फक्त सत्तेपुरते,तर मग भाजपची सत्ता आसताना ही महाराष्ट्रातले उद्योग गुजरात मधे हलवणार्या मराठी भय्यांना ही युपीच्या फिल्मसिटी मधे पाठवा. अशी संतापजनक प्रतिक्रिया येताना दिसली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा