अंतराळामध्ये पहिल्यांदाच घेण्यात आलं ‘हे’ पिक, नासा’नं शेअर केले फोटो

वॉशिंग्टन, ६ डिसेंबर २०२०: शास्त्रज्ञांनी प्रथमच अवकाशात मुळा पिकं घेतली आहे. २०२१ मध्ये ते पृथ्वीवर आणले जाईल. नासाच्या अंतराळवीर आणि उड्डाण अभियंता केट रुबिन्स यांनी प्रथमच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात उगवलेल्या मुळा पिकांची कापणी केली आहे. २०२१ मध्ये पृथ्वीवर आणण्यासाठी केट यांनी २० मुळा रोपे तयार केले आहेत आणि कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवले आहेत.

वास्तविक, नासा’नं ट्विटरवरुन त्याविषयी माहिती दिली आहे. नासा’नं या प्रयोगाला प्लांट हॅबिटेट -०२ असं नाव दिलं आहे. मुळा स्पेस स्टेशनमध्ये वाढण्यास निवडले गेले कारण, शास्त्रज्ञांना खात्री होती की, २७ दिवसात हे पीक पूर्ण होईल. अंतराळात घेण्यात आलेल्या मुळ्याच्या या पिकांमध्ये पोषक तत्व आहेत, तसेच ते खाण्यालायक देखील आहेत.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या ट्विटरवर असं वृत्त देण्यात आलं आहे की, या प्रयोगासाठी मुळ्याचा वापर का केला केला आहे तर, मूळा हे अल्पकाळात वाढणारं पीक असून ते पौस्टीक देखील असतं.

नासाच्या मते मुळा वाढण्यास फारच कमी काळजी घ्यावी लागते. स्पेस चेंबरमध्ये जीथं हे पीक वाढलं आहे तिथं लाल, निळी, हिरवी आणि पांढरी एलईडी लाइट लावण्यात आली आहे. याचं कारण असं आहे की, यामुळं झाडांची वाढ होण्यास मदत होईल. जागेमध्ये पिकलेल्या मुळ्याची तुलना फ्लोरिडामधील केनेडी स्पेस सेंटरमध्ये वाढलेल्या मुळ्याशी केली जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा