जेनेवा, ६ डिसेंबर २०२०: संपूर्ण जग कधी कोरोना महामारी संपेल याची वाट बघत आसतानाच जागतिक आरोग्य संघटनेकडून एक दिलासादायक वक्तव्य करण्यात आले आहे. ज्याची वाट संपूर्ण जगच करत होते. करोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांन केलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस च्या या वक्तव्यावरून सर्वत्र समाधान व्यक्त केलं जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. असं असलं तरीही जे प्रगत आणि श्रीमंत देशांनी लसीच्या आशेवर गरीब आणि मागास देशांना ठेवू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस हे या सभेत असं म्हणाले की “करोना काळात जगानं माणसाची चांगली रुपं पाहिली आहेत तशीच वाईटही रुपं पाहिली आहेत. मात्र ही महामारी संपली तरीही गरीबी, भूक आणि असमानता यामध्ये परिवर्तन होऊ शकतं हे विसरुन चालणार नाही. ”
करोना व्हायरसमुळे जगभरात अनेक लोकांचे मृत्यू झाले आहेत. तसंच संक्रमणही पूर्णपणे संपलेलं नाही त्यामुळं काळजी घ्यावी लागणार आहेच. करोनावरची लस जेव्हा येईल त्यानंतर संपूर्ण जगाला गरीबी, उपासमारी, असमानता यांच्याशीही आपल्याला लढावं लागणार आहे असंही टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव