‘थिंक सीएसआर युवा सबलीकरण पुरस्कार २०२०’ ने अंकिता पाटील यांचा सन्मान…

इंदापूर, ६ डिसेंबर २०२०: पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इसमा च्या कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा अंकिता हर्षवर्धन पाटील यांना टेफला ग्रुपच्या वतीनं ‘थिंक सीएसआर युवा सबलीकरण पुरस्कार २०२०’ राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

अंकिता पाटील यांच्या पायाला दोन दिवसांन पुर्वी दुखापत झाली होती. त्यामुळे डॉक्टरांकडून परवानगी मिळाल्यानंतरच त्या या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहिल्या.

‘थिंक फाउंडेशन‘ हा टेफला ग्रुपचा एक सामाजिक उपक्रम आहे. सामाजिक विकास, कॉर्पोरेट गव्हर्नन्स या संबंधी उपक्रमांना समर्थन देणे तसेच कला, साहित्य, संस्कृती आणि शिक्षणास प्रोत्साहन देण्याचे कार्य टेफला ग्रुप थिंक फाउंडेशनच्या माध्यमातून करतो.

अंकिता या युवकांना व्यवसायात येण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत तसेच विविध माध्यमातून युवकांची प्रगती कशाप्रकारे होईल यासाठी त्या प्रयत्न करत आहे. अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी कोविडच्या काळामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरी व युवकांसाठी राबवत असलेल्या उपक्रमांची दखल घेत कु. अंकिता यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

प्रसंगी कु. अंकिता पाटील म्हणाल्या,

“मला या वर्षीचा थिंक सीएसआर युवा सबलीकरण पुरस्कार प्रदान केल्याबद्दल टेफला फाउंडेशन ग्रुपचे व थिंक फाउंडेशनचे खूप खूप आभार. आपण व्यक्ती म्हणून समाजाचे काही देणे लागतो. समाजासाठी विशेषता युवकांसाठी आपण काहीतरी करावे या उद्देशातून मी कार्य करत आहे या पुरस्काराने मला पुढील कार्य करण्यास अजून प्रोत्साहन मिळाले आहे व एक नवीन ऊर्जा प्राप्त झाले आहे.” या पुरस्कार वितरण समारंभासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा