नवी दिल्ली, १३ डिसेंबर २०२०: कृषी कायद्याविरोधात शेतकर्यांचं आंदोलन सतराव्या दिवशीही सुरू होतं. आज दिल्लीतील या आंदोलनाचा अठरावा दिवस आहे. दिल्ली-जयपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबविण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. दुसरीकडं हरियाणातील शेतकऱ्यांनी टोल प्लाझाला घेराव घालण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे गुरुग्राम आणि फरीदाबाद येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे आणि सुरक्षेची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.
याचिकांवर १६ डिसेंबर रोजी होणार सुनावणी
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर १६ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सीजेआय एसए बोबडे, न्यायमूर्ती एएस बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांचं खंडपीठ सुनावणी घेईल. सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत तीन याचिका दाखल झाल्या आहेत.
दिल्ली-नोएडा सीमा उघडली
दिल्ली-नोएडा चिल्ला सीमा उघडली गेली आहे. सर्व बॅरिकेडिंग काढलं गेलं आहे. वाद विवादात असणारी सीमा गेले १२ दिवस बंद होती. काल शेतकऱ्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची भेट घेतली. संमती झाल्यानंतर सीमा खुली करण्यात आली. सभेवर बसलेल्या शेतकर्यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. संरक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानी ५ सदस्यांची टीम भेटली. या बैठकीत कृषिमंत्रीही उपस्थित होते. संरक्षणमंत्र्यांसमोर १८ कलमी मागण्या मांडण्यात आल्या. मुख्य मागणी शेतकरी आयोगाची राहिली. एमएसपीचा या मागण्यांमध्ये उल्लेख नव्हता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे