रेमो डिसोझा यांच्या तब्येतीत सुधार, पत्नीनं दिली माहिती

मुंबई, १३ डिसेंबर २०२०: कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्यानंतर मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली. आता रेमो यांच्या पत्नीनं त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. शनिवारी एका न्यूज पोर्टलशी झालेल्या संभाषणात लिजेल म्हणाल्या की, रेमो आता ठीक आहेत.

लिजेल म्हणाल्या की, रेमो आता ठीक आहे. परंतु रविवारी त्यांचे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीबाबत निर्णय घेतील. रेमो डिसोझा यांची प्रकृती खराब झाल्याचं ऐकून त्यांचे जवळचे मित्र त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले. त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी लिजेल रुग्णालयात होती. यानंतर, नृत्यदिग्दर्शक धर्मेश सर, अहमद खान, आमिर अली, राहुल देव आणि सलमान युसूफ खान यांनी त्यांना रुग्णालयात भेट दिली.

रेमो डिसोझा यांच्या बातमीनंतर त्यांचे मित्र आणि डान्स रिअॅलिटी शोच्या जज गीता कपूर आणि टेरेंस लुईस यांनी सोशल मीडियावर कोरिओग्राफर रेमो साठी प्रार्थना केली.

शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास रेमो डिसोझा यांना हृदयविकाराचा झटका आला. असं सांगितलं जात आहे की, रेमो यांच्या हृदयातून ब्लॉकेज काढून टाकल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आलं. त्यांची प्रकृती अद्याप स्थिर आहे आणि डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा