डासा मुळे पतीला मारहाण

अहमदाबाद: येथे डास चावल्याने संतापलेल्या पत्नीने पतीला चोपल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील अहमदाबाद येथे घडली आहे. या मारहाणीत मुलीनेही आईची साथ देत पित्याला बेदम मारहाण केली. यामुळे त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून आठ टाके पडले आहेत.
याप्रकरणी आरोपी महिलेला व तिच्या मुलीला अटक करण्यात आली आहे. भूपेंद्र असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. तर संगिता असे त्याच्या पत्नीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भूपेंद्र नरोदा येथे पत्नी संगिता व मुलगी शितलबरोबर राहतो. भूपेंद्र एलईडी लाईटचा व्यवसाय करतो. पण त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्याची आर्थिक परिस्थिती खालावली होती. त्यात त्याने दोन महिन्याचे लाईटबिलही त्याने भरले नव्हते. त्यामुळे त्याच्या घराची लाईट कट करण्यात आली होती. या कारणावरून त्याचे घरच्यांसोबत सतत भांडणे होत होते.
त्यातच मंगळवारी (दि.१३) रोजी रात्रीच्या वेळी त्याची पत्नी संगिताला डास चावले. त्यामुळे तिची झोपमोड झाली. यामुळे संतापलेल्या संगिताने बेडवर बाजूला झोपलेल्या भूपेंद्रला लाथ मारुन बेडवरून खाली पाडले. या प्रकारामुळे भूपेंद्रने पत्नी संगीताला शांत राहण्यास सांगितले.पण ती अधिकच भडकली. त्यावर तिने किचनमधून मुसळ आणली व भूपेंद्रला मारण्यास सुरुवात केली. हे बघताच त्याची मुलगी शितलनेही आईला मदत केली. तिनेही काठी आणून वडिलांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. भूपेंद्र मदतीसाठी ओरडत असल्याने त्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर भुपेंद्रला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारहाणीत त्याच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून आठ टाके पडले आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा