डेट्ऱॉईड, १६ डिसेंबर २०२०: प्रेम आंधळं असतं असं उगीच म्हणत नसतात. मात्र, यामधील घटना कधीकधी मन हेलावून टाकतात. अमेरिकेमधे अशीच एक घटना घडली आहे. चुंबन (किस) करताना तरूणीची अट विसरल्यानं एका तरूणाला चांगलंच महागात पडलं आहे. ही घटना अमेरिकेतली डेट्ऱॉईड शहरातील आहे. येथे एका तरूणीनं किस करण्याच्या पद्धतीनं नाराज होऊन आपल्या पार्टनरच्या जीभचाच लचका तोडला.
महिलेनं पुरूषाला सांगितलं की, तिला फ्रेंच किस करू नये. ५५ वर्षाच्या यूलेट वेगेवॉर्थ नावाची एक महिला आपल्या मर्जीनं एका पुरूषासोबत किस करत होती. पण, तरूण चुंबनच्या जोशात तरूणीची ‘ही’ अट विसरला आणि हॉस्पिटलमध्ये पोहचला.
वारंवार नकार दिल्यानंतरही पुरूषानं त्या महिलेचं म्हणणं ऐकलं नाही, तेव्हा युलेटनं त्याच्या जीभेचा लचकाच तोडला. घटनेनंतर त्वरीत पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पुरूषाला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. पोलिसांनी त्या खोलीतून पुरुषाच्या सुमारे एक इंच लांब जीभेचा तुकडा ताब्यात घेतला. प्रॉसिक्यूटर स्मिथ यांनी सांगितलं की, आपल्या २७ वर्षांच्या करिअरमधये पहिल्यांदा अशी घटना पाहिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव