फ्रान्स, १८ डिसेंबर २०२०: फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं आहे. राष्ट्रपती कार्यालयानं गुरुवारी निवेदन पाठवून याबाबत माहिती दिली. निवेदनात म्हटलं आहे की, अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. हे निवेदन एलिसी पॅलेस’नं जारी केलं आहे. तेथील राष्ट्रपती महल ‘एलिस पॅलेस’ म्हणून ओळखला जातो.
इमॅन्युएल मॅक्रॉन ७ दिवसांपर्यंत आयसोलेट राहतील. तथापि, ते कार्यरत राहतील. इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या अगोदर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटिश पंतप्रधान बोरिश जॉनसन आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष झैरे बोलसनोरो यांनाही कोरोनाची लागण झाली होती. हे सर्व नेते आता स्वस्थ आहेत.
फ्रान्समध्ये कोरोना विषाणूची २.४ दशलक्षाहूनही जास्त प्रकरणं आहेत. त्याच वेळी, ५९ हजाराहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अलीकडंच पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमवेत कोरोना लसीबाबतही चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी कोरोना लस, साथीच्या संकटाच्या नंतरची आर्थिक सुधारणा, इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सहकार्य, सागरी सुरक्षा, संरक्षण सहकार्य आणि हवामान बदलांमध्ये सुधारणा यावर चर्चा केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव