ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघाचा दणाणून पराभव, मालिकेत १-० ने आघाडीवर

मुंबई, १९ डिसेंबर २०२०: ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी ८ विकेट्सने पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक माऱ्यापुढे भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत संपला. आजच्या ह्या झालेल्या पराभवासह भारताने आपल्या टेस्ट क्रिकेट कारकिर्दीतील सर्वांत नीचांकी धावसंख्या नोंदवली.

आजच्या दिवसात ऑस्ट्रेलियाने भारताचे नऊ गडी बाद करत भारतीय संघाला केवळ ३६ धावा करण्याची संधी दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर केवळ ९० धावांचे आव्हान होते. मिळालेले हे छोटे आव्हान ऑस्ट्रेलियाने केवळ दोन गडी गमावून अवघ्या २१ षटकात पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करत ९३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जो बर्न्सने नाबाद ५१ धावा केल्या. तर मॅथ्यू वेडने ३३ धावा केल्या. टीम इंडियाकडून रवीचंद्रन आश्विनने एकमेव विकेट घेतली.

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स या जोडीने ७० धावांची भागीदारी केली. यानंतर मार्नस लाबुशेनही आश्विनच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळताना बाद झाला. यानंतर विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण करत ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

टीम इंडियाने दुसऱ्या डावात लाज काढली. कांगारुंच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाला ९ विकेट्स गमावून ३६ धावाच करता आल्या. मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट झाल्याने टीम इंडियाचा दुसरा डाव ३९-९ धावांवर घोषित करण्यात आला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाकडे ६२ धावांची आघाडी होती. दुसऱ्या दिवसखेर मयंक अग्रवाल आणि जसप्रीत बुमराह नाबाद होते. मात्र तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. यानंतर टीम इंडियाचा दुसरा डाव पत्त्यासारखा कोसळला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा