कोविड रुगणाच्या मुलाने मानले डॉक्टरांचे आभार

बारामती १९ डिसेंबर २०२०: मच्छिंद्र बजरंग कांबळे ( वय ८५ ) यांना कोविडची बाधा होऊन तब्बेत अत्यंत खालावल्याने त्यांना बारामती शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे वय व गंभीर परिस्थिती ओळखुन शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या सर्व टीमने योग्य उपचार करून त्यांना ठणठणीत बरे केले व आज त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. कांबळे यांचा मुलगा मेगनाथ कांबळे यांनी यावेळी सर्व डॉक्टरांच्या टीमचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

पंढरपूर येथील मच्छीन्द्र बजरंग कांबळे ( वय ८५ ) हे बारामतीत मुलीकडे असताना त्यांना कोरोनाची बाधा झाली. वयामुळे त्यांची प्रकृती खालावली व ते अत्यवस्थ झाले. त्यांना बारामतीयेथील शासकीय रुगाणल्यात दाखल केल्यावर अतिदक्षता विभागात दाखल केल्यावर त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. त्यांना अकरा दिवस अतिदक्षता विभागात उपचार करत येथील सर्व डॉक्टरांच्या टीमने योग्य इलाज करत ठणठणीत बरे केल्याने कांबळे यांचा मुलगा मेघनाथ कांबळे यांनी सर्व टीमचे कौतुक करत माझे वडील दवाखण्यात दाखल केल्यावर त्यांची परिस्थिती नाजूक होती. मात्र, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, डॉ महेश जगताप, डॉ निर्मल वाघमारे,डॉ रणजित मोहिते, डॉ अमित कोकरे, डॉ अक्षय जरांडे, डॉ दीपा निगडे यांनी योग्य उपचार केला व त्यांना नेहमी धीर देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला.

सरकारी रुग्णालयाच्या बाबतीत बारामती शासकीय रुग्णालयाची टीम मेहनती असून येथे सर्व सोयी आहेत. खाजगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च करून देखील आम्हाला एवढी चांगली सोय मिळाली नसती असे कांबळे यांनी डॉक्टरांचे आभार मानत सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा