जम्मू-काश्मीर, २२ डिसेंबर २०२०: जम्मू-काश्मीर जिल्हा विकास परिषद (डीडीसी निवडणुकीचा निकाल) निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. आठ टप्प्यात एकूण २८० जागांवर मतदान झाले. २१७८ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. कलम ३७० हटवल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे. म्हणून प्रत्येकजण या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे. निवडणुकीतही भाजपाने पूर्ण जोर दिला आहे, त्याचा परिणाम आतापर्यंतच्या निकालात दिसून येतो. मात्र, गुपकार युती भाजपच्या तुलनेत पुढे असल्याचे दिसते.
गुपकार ९५ तर भाजप ५४ जागांवर आघाडीवर
डीडीसी निवडणुकीची ताजी अद्यतने समोर आली आहेत. २८० पैकी २३१ जागांसाठीच्या अद्ययावत यादीमध्ये गुपकार ९५ जागांवर आघाडीवर आहे. त्यापैकी २५ जागा जिंकल्या आहेत, तर ५४ जागांवर भाजप आघाडीवर आहे, त्यापैकी ५ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. अपक्ष ५६ जागांवर आघाडीवर आहेत, त्यापैकी ८ जागा जिंकल्या आहेत. कॉंग्रेस १९ जागांवर आघाडीवर आहे, यापैकी ४ जागा जिंकल्या आहेत, तर अपनी पार्टी ७ जागांवर पुढे आहे, त्यापैकी ४ जागा जिंकल्या आहेत.
मेहबूबा मुफ्ती यांनी वाहिद परा यांचे केले अभिनंदन
पीडीपी चीफ मेहबूबा मुफ्ती यांनी आपली युवा उमेदवार वहीद पारा यांच्या विजयाचे अभिनंदन केले आहे. वहिद पारा सध्या तुरूंगात आहे. वाहिद यांना एनआयए’ने अटक केली आहे. वहीदच्या विजयावर मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘नामनिर्देशन दाखल केल्यावर निराधार आरोपात ताबडतोब अटक झाली असली तरी जनतेने वाहीदवर त्यांचे प्रेम आणि विश्वास दाखविला आहे.’
भाजपचे हे तीन उमेदवार विजयी
भाजपने आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात डीडीसीच्या तीन जागा जिंकल्या आहेत. पुलवामा येथील काकपुरा मतदारसंघातून भाजपची उमेदवार मिन्हा लतीफ विजयी झाली. श्रीनगरमधील खानमोह सीटचे अभियंता एजाज आणि बांदीपुराच्या तुलेल सीटवरुन एजाज अहमद खान यांना विजय मिळाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे