सासवड येथे दोन सदनिका फोडून दोन लाख पंचेचाळीस हजाराचे दागीने लंपास

पुरंदर, २४ डिसेंबर २०२०: पुरंदर तालुक्यातील सासवड येथील सोनारी रोडवर असलेल्या स्वामी समर्थ हाउसिंग सोसायटी प्लाॅट नं. ७ व महा लक्ष्मी अपार्ट मेंट मधील दोन सदनिका फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. दि.२२ रोजी दुपारच्या सुमारास या घटना घडल्या आहेत

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सासवड येथील शुभम विट्ठल शितकल यांचे स्वामी समर्थ हाउसिंग सोसायटी मध्ये असलेली सदनिका फोडून चोरट्यांनी १,००,०००/- रुपये किमतीचा गळयातील आडीच तोळे वजनाचा  सोन्याचा घंठन २०,०००/- रूं.कि.ची आर्धातोळे वजनाची सोन्याची अंगठी, ५,०००/- रू.किं.चे चांदीचा बाजुबंद,कमरेचा पट्टा, पैजण, मेकला, असा एकूण १,२०,०००/- रूपायाचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.

तर सौ. सुप्रिया निलेश खळदकर महालक्ष्मी अर्पाटमेंट सोनोरी रोड सासवड यांचेघरी सुध्दा याच दरम्यान चोरी झाली असुन त्यात त्यांचे १,००,०००/- रू.किं.चा. गळयातील आडीज तोळे वजनाचा सोन्याचा घंठन, २०,०००/- रू. किमतीची आर्धातोळे वजनाची सोन्याची अंगठी असे १,२०,०००/- रू. किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरीस गेले आहेत. असा एकुण २,४५,०००/- रू. किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिणे चोरीस गेले.

पोलिसांनी या बाबत भा.द.वी. कलम ४५४, ३८० नुसार अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.तर या घटने नंतर सी सी टिव्ही मध्ये चोरट्यांचे आलेले छायाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केले असून हे लोक आढळल्यास सासवड पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोपलाप यांच्या मार्ग दर्शना खाली सहायक पोलीस निरीक्षक माळी करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा