ब्राझिलिया: ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे सदस्य असलेल्या ब्रिक्स संघटनेची अकरावी परिषद ब्राझीलची राजधानी ब्राझीलिया मध्ये सुरू झाली आहे.
दहशतवादामुळे विकसनशील देशांचा आर्थिक विकास १.५ टक्क्यांनी घटला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेलाही एक ट्रिलियन डॉलर का फटका बसला आहे तसेच गेल्या दहा वर्षात दोन लाख लोकांचा दहशतवादामुळे बळी गेला आहे. दहशतवाद , अमली पदार्थांचा व्यवहार आणि संघटित गुन्हेगारी हे विकासाचे शत्रू आहे असे मोदी म्हणाले.
दहशतवादामुळे जगभरात आत्तापर्यंत एक ट्रिलियन म्हणजेच एक हजार अब्ज डॉलरचे नुकसान झाले असून दहशतवाद हे विकास, शांतता आणि समृद्धी समोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी काल ब्रिक्स परिषदेत केला.