मुंबई, ३० डिसेंबर २०२०: २०२० च्या वर्षाला निरोप देण्यासाठी उद्या ३१ डिसेंबरचा प्लॅन करत असाल तर सावधान.कोरोना व्हायरस मुळे २०२० माणसं कधीच विसरणार नाही असं वर्ष गेलं आहे. अनेकांचं कुटुंबं उध्वस्त झालं. त्यांच्या कडू आठवणी तर आता जन्मभर पाठ सोडणार नाहीत. २०२० चा काळच इतिहासात काळा म्हणून कुठे तरी नोंद होईल. त्यासाठीच सर्व नागरिक कधी हे वर्ष संपून नवीन वर्ष येईल यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, अजुनही कोरोनाचा प्रादुर्भाव टळला नसून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं ३१ डिसेंबर साठी काही नियमावली काढली आहे.
सरकारनं काढलेली ३१ डिसेंबरसाठीची नियमावली…….
• नागरिकांना ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी बाहेर न पडता घरीच राहुन साधेपणाने नववर्षाचे स्वागत करावे.
• ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारे, बागा, रस्ते अश्या सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी न करता सोशल डिन्स्टंसिंग तसेच मास्क, सॅनेटायझरचा वापर होईल याकडं विशेष लक्ष्य दिलं पाहीजे.
• मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमधे देखील नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते. त्या दृष्टीकोनातून आणि कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
• कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीनं शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.
• नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणूका काढण्यात येऊ नये.
• नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जातात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिन्स्टंसिंगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातुन योग्य त्या खबरदारीच्या उपाय योजना कराव्यात.
• फटाक्यांची आतिशबाजी करण्यात येऊ नये.ध्वनी प्रदुषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोर पणे पालन करण्यात यावे.
• कोविड १९ या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाची मदत आणि पुनर्वसन विभाग, आरोग्य विभाग, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे कायदेशीर काटेकोर पणे पालन करावे.
• ३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्ष सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत काही सुचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. अशा सुचना गृह विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी याचे पालन करावे, असे आवाहन गृहविभागामार्फत करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव