गतवर्षाच्या कटू आठवणी विसरा: हर्षवर्धन पाटील

इंदापूर, २ जानेवारी २०२१: गतवर्षीच्या कोरोना व्हायरसमुळं निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा समाजातील प्रत्येक घटकाला त्रास सहन करावा लागला. त्याचा विपरीत असा परिणाम समाज जीवनावरही झाला. जनतेला असंख्य आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं. शिवाय दुर्दैवानं अनेक नागरिकांना कोरोनामुळं जीव गमवावा लागला.

गतवर्षीच्या या असंख्य कटू आठवणी विसरून, जनतेनं आता नव्या जोमानं उज्वल भवितव्यासाठी कार्यरत रहावं, असं आवाहन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देताना शुक्रवारी (दि.१) केलं.

मार्च महिन्यापासूनच्या कोरोनाच्या संकटानं प्रत्येक कुटुंबाला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं, मात्र जनतेनं दाखवलेलं धैर्य कौतुकास्पद आहे. तसंच जनतेची सामाजिक एकजूट वाखाणण्याजोगी होती. आता देशातील कोरोनाचं संकट दुर होत चाललं असून काही दिवस सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मात्र, निश्चितपणे चालू सन २०२१ वर्ष जनतेला आरोग्यदायी व आनंददायी जाईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. तसेच नवीन वर्ष हे देश व महाराष्ट्रासाठी प्रगतीचं जाईल. देशाचा विकास दर वाढून समृद्धी निर्माण होईल, असा विश्वासही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा