बीजिंग, ४ जानेवारी २०२१: चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले जॅक मा गायब असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी चिनी सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या संस्थांच्या कार्य करण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते.
फायनान्शिअल टाईम च्या म्हणण्यानुसार जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेताना दिसले नाहीत. टीव्हीवरील असलेल्या ‘आफ्रिकेचे बिझनेस हिरो’ त्यांच्या या शोमध्ये ते स्वतः उपस्थित न राहता त्यांच्या जागी वेगळ्या व्यक्तीला पाठवण्यात आले होते. तथापि अलीबाबा च्या एका प्रवक्त्याने याचे स्पष्टीकरण देत असे सांगितले होते की, जॅक मा यांच्या बिझी शेड्युलमुळे त्यांना या शोमध्ये भाग घेता आला नाही.
अहवालानुसार, ज्याअर्थी गायब झाले आहेत त्या अर्थी ते नक्कीच अडचणींचा सामना करत असावेत. तसं बघितलं तर चीनमध्ये कोटींची मालमत्ता असलेले लोक गायब होणे हे काही नवीन नाही. फोर्ब्स च्या एका रिपोर्टनुसार २०१६ ते २०१७ या कालावधीत चीनमधील अनेक करोडपती गायब झाले आहेत.
या रिपोर्टनुसार २०१६ ते २०१७ या कालावधीत गायब झालेले हे करोडपती पुन्हा नजरेस आले नाहीत. असे सांगितले जात आहे की, हे करोडपती गायब होण्यामागचे कारण त्यांची पत्नी, प्रेमिका, व्यापार आणि व्यापारातील स्पर्धा आहे. परंतु, गायब झालेला या श्रीमंत लोकांपैकी जे लोक पुन्हा आले आहेत त्यांचे असे म्हणणे आहे की, ते अधिकाऱ्यांना मदत करत होते.
नोव्हेंबरमध्ये जॅक मा यांनी चीनमधील रेगुलेटर आणि बँकांची आलोचना केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून अधिकाऱ्यांनी जॅक मा यांच्यावर पलटवार करत त्यांची कंपनी अँट ग्रुप च्या आयपीओ ला स्थगिती दिली होती.
गेल्या आठवड्यात चिनी एजन्सीजने सांगितले की ते जॅक मा यांची कंपनी अँट ग्रुपविरूद्ध अविश्वास तपास सुरू करीत आहेत. त्याचबरोबर अँट ग्रुपला ग्राहक वित्त कार्य बंद करण्याचे आदेशही देण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे